scorecardresearch

नागपूर : दोन डॉक्टरांनाही करोना ; ६५ नवीन रुग्णांची भर

मंगळवारी जिल्ह्यात २४ तासांत ६५ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. ग्रामीण भागातील दोन डॉक्टर्सही बाधित झाले.

corona
संग्रहित छायाचित्र

मंगळवारी जिल्ह्यात २४ तासांत ६५ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. ग्रामीण भागातील दोन डॉक्टर्सही बाधित झाले. सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ४२१ वर गेली.

नागपूर जिल्ह्यात आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील ४५, ग्रामीणचे २० अशा एकूण ६५ रुग्णांचा समावेश आहे. तर एकूण ३६ बाधित करोनामुक्त झाले. शहरात दिवसभरात १ हजार ७४८, ग्रामीणमध्ये ६३५ अशा एकूण २ हजार ३८३ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. ६५ जणांचे (२.७२ टक्के) अहवाल सकारात्मक आले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two doctors infected corona in nagpur district amy

ताज्या बातम्या