राळेगाव तालुक्यातील सरई येथे बैल धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.गजानन राजुरकर (२५) व रावबा टेकाम (४२) रा. सरई अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. पोळ्यानिमित्त दुपारी ते बैल धुण्यासाठी शेततळ्यात गेले होते. मात्र अचानक शेततळ्यात खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते शेततळ्यात बुडाले.

गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यातील एका शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला. दुसऱ्या शेतकऱ्याच्या मृतदेह सायंकाळी सापडला. ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.