scorecardresearch

मध्यवर्ती कारागृहातील दोघा कैद्याचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव पंच याने कोतवालीतील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते

(प्रातिनिधीक छायाचित्र)

नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा आकस्मिक मृत्यू झाला. बाबुराव मारोतीराम पंच (५९), जगनाडे चौक असे मृत कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव पंच याने कोतवालीतील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. या प्रकणारात त्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. न्यायालायने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो २०१८ पासून मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. २३ फेब्रुवारीला त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

१.६४ कोटींची फसवणूक करणाऱ्या बंदिवानाचा मृत्यू

प्रतापनगर पोलीस ठाण्यात १.६४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाला. नरेंद्र राजेश वाहने (३९) रा. आदिवासी सोसायटी, झिगाबाई टाकळी असे मृताचे नाव आहे. प्रतापनगर ठाण्यात नोंद असलेल्या फसवणूक प्रकरणामध्ये पोलिसांनी नरेंद्रसह त्याचा भाऊ विजय ऊर्फ नीलू राजेश वाहनेला अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांचीही न्यायालयीन कोठडीमध्ये तुरुंगात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी रात्री अचानक नरेंद्रची प्रकृती बिघडली. त्याला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान नरेंद्रचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two inmates sudden death in nagpur central jail zws

ताज्या बातम्या