चंद्रपूर : दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पहिल्या घटनेत भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाईनवर रेल्वे खाली उडी घेऊन महेश विजय जुनघरे (४७) रा. कुटाळा याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
हेही वाचा – राज्यात कुठे पाऊस, कुठे उन, वाचा.. तुमच्या गावात कसे असेल वातावरण?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दुसऱ्या घटनेत शुक्रवारी गजानन बबन गाताडे (४८) रा. विजासन नेताजी वार्ड याने विजासन परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या केली. गजानन गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होता. या दोन्ही घटनांचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस शिपाई विजय नागपूरकर करीत आहेत.