गोंदिया : अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या आरोपींनी आमगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे जेथे पोलीसच सुरक्षित नाही तिथे सामान्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना रविवारी रात्री आमगाव तालुक्यातील भोसा येथे घडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आमगाव तालुका मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागून असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे होत असतात. या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. रविवारी रात्री विजय चुनीलाल कोसमे व प्रवीण मोगरे हे रात्रगस्त करीत होते. अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना मारहाण, शिविगाळ करीत त्यांचा मोबाईलही हिसकावून घेतला.

हेही वाचा – “सत्तास्थापनेच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक चूक”, ॲड. असीम सरोदे यांचे परखड मत, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहिती मिळताच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. जखमी पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भुमेश्वर बुधराम ब्राह्मणकर, सुनील भुमेश्वर ब्राह्मणकर, अनिल भुमेश्वर ब्राह्मणकर, मनोहर फरकुंडे, संतोष ब्राह्मणकर या पाच आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.