नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरूंग स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना गडचिरोतील कोरची या नक्षल प्रभावग्रस्त भागात घडली. जखमींना उपचारासाठी हेलिकॉप्टरने त्वरीत नागपूरला हलवण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. (सविस्तर वृत्ताची प्रतिक्षा)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी छत्तीसगढ येथील तेलंगणा सीमेवर मोठी चकमक झाली. या चकमकीत १२ माओवादी ठार झाले. विशेष माओवादी विरोधी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. तेलंगण सीमेवरील गोदावरी नदीलगत असलेल्या पुजारी कांकेर जंगलात ही चकमक झाली. यात एक जवान शहीद झाला. तसेच १२ माओवाद्यांमध्ये ६ महिलाही असल्याचे सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two policemen injured in a landmine blast by naxals in gadchirolis korchi
First published on: 05-03-2018 at 09:56 IST