वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाला स्पर्श झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्यातील परसटोला झुडपी जंगलाजवळील टेकडी परिसरात शनिवारी रात्री उशिरा घडली. आशीष कोसरे (२६), व अनमोल गायकवाड (२२) दोघे राहणार परसटोला ता.देवरी, अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा >>>चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

देवरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , परसटोला जंगल परिसरात शिकार करण्याच्या उद्देशाने लोखंडी तारेला विद्युत प्रवाह देऊन कुंपण करण्यात आले होते. रात्री जंगलात गेलेल्या या दोघा तरुणांचा त्या तारेला स्पर्श झाला. यात दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. देवरी पोलीस पुढील तपास करीत आहे.