अमरावती : सहायक प्राध्यापक तसेच ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी अनिर्वाय असलेल्या यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींना आतापासूनच अभ्यासाला लागावे लागणार आहे.

‘एनटीए’च्या वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ६ डिसेंबरला पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परदेशी भाषांची परीक्षा असेल. तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील. ७ डिसेंबरला पहिल्या सत्रात वाणिज्य विषयाची परीक्षा पार पडणार आहे. तर दुसऱ्या सत्रात शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा होईल.

हेही वाचा – नागपूर : विमान धावपट्टीऐवजी चक्क ‘टॅक्सी वे’वर उतरले!

हेही वाचा – चंद्रपूर : १० महिन्यांत १०७ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यशास्त्राची परीक्षा ११ डिसेंबरला पहिल्‍या सत्रात होणार आहे. दुसऱ्या सत्रात हिंदीची परीक्षा घेतली जाईल. १२ डिसेंबरला पहिल्या सत्रात अर्थशास्त्रासह उर्दू तर दुसऱ्या सत्रात मराठी, भूगोल, तामीळचा पेपर होईल. १३ डिसेंबरला पहिल्‍या सत्रामध्ये होम सायन्स, सोशल वर्क तर दुसऱ्या सत्रामध्ये संस्कृत, ह्युमन राइट्स, १४ डिसेंबरला मानसशास्त्र व लॉ आणि पर्यावरणशास्त्राचे पेपर होणार आहेत.