लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: ‘ओटीटी’वर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नसल्याचे ठाकूर म्हणाले.

आणखी वाचा- नागपूरमध्ये आजपासून ‘सी-२०’ परिषद, ‘जी-२०’अंतर्गत कार्यगट बैठकीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पाकिस्तानमध्ये एशिया कप असताना भारताची चमू त्या ठिकाणी जाऊ की नये याबाबत बीसीसीआयने निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेईल असेही ठाकूर म्हणाले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्याना चांगले क्रीडा प्रशिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जात आहे. देशभरात आदिवासी भागातील खेळाडू समोर येत आहे. विशेषत: क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतो आहे. खेलो इंडिया संबंधी आतापर्यंत देशभरात ९४५ केंद्र सुरू करण्यात आले असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत एक हजार केंद्र सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.

नागपुरात होत असलेल्या साई क्रीडा संकुल प्रकल्पाबाबत विचारले असताना ठाकूर म्हणाले. ज्या ठिकाणी या प्रकल्प होत त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र, जो भाग मोकळा आहे तिथे बांधकाम करण्यास लवकरच सुरूवात केली जाणार आहे.

‘ते’ महिलांच्या विषयावर गंभीर नाहीत

काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये महिलांच्या प्रश्नाबाबत केलेल्या भाषणाबाबत आणि त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी दिलेल्या नोटीसवर अनुराग ठाकूर म्हणाले की, महिलांविषयी आरोप केले जात असेल तर ते का लपवत आहे. खासदार असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. अनेकदा काहीतरी बोलून चर्चेत राहणे ही काही लोकांची सवय झाली आहे, अशी टीका ठाकूर यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister anurag thakur reaction on profanity and obscenity on ott platform vmb 67 mrj
First published on: 20-03-2023 at 09:26 IST