बुलढाणा : बुलढाणा, अकोला अमरावती तिन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भैरवगड हनुमान सागर या बृहत प्रकल्पत ७९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.यामुळे धरणा विसर्ग सोडण्यात येत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोमीनाबाद व रिंगणवाडी (तालुका संग्रामपूर ) या गावांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. दरम्यान वान नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेत व केळीच्या बागात पुराचे पाणी शिरले आहे.
सातपुडा पर्वत राजीत कोसळधार पाऊस बरसत असल्याने २४ ऑगस्टला सायंकाळी २ वक्र द्वारे उघडण्यात आली. ५० से मी विसर्ग वाननदि पात्रात सोडण्यात येत असल्याने वान नदिला पुर आला.मोमीनाबाद (उबर्डी ) दरम्यान रिंगणवाडी कोल्हापुरी बंधारा कमी उंचीचा असल्याने या बंधाऱ्या वरुन ६ फुट पाणी वाहत आहे. यापरिनामी मोमीनाबाद व रिंगणवाडी गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरी बंधारा कमी उंचीचा असून बंधाऱ्या वरून पाणी वाहत असल्याने पायी जाणे देखील अशक्य झाले आहे.
परिणामी मोमीनाबाद गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे वान प्रकल्पात आज ७९% पाणी असुन ऑगस्ट महिण्यात ७३% जलसाठा ठेवण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रकल्पातुन विर्सग सुरु आहे वाननदि काठावरील रिंगणवाडीची शेती मोमीनाबाद शिवारात असल्याने रिंगणवाडी येथील शेतकऱ्यांची रासायनिक फवारणी, निंदण ची कामे प्रभावीत झाली. नदिकाठ वरील शेतकरी संतोष रावनकार , वसंता रावणकार , सारंगधर रावणकार , नारायण बोरवार, प्रविण देऊळकार याच्या केळी बागात पाणी घुसल्याने संबंधीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रिंगणवाडी मोमिनाबाद या दोन गावा दरम्यान मिनी कोल्हापुर बंधारा बांधण्यात आला. मात्र पुल बंधाऱ्याची उंची कमी असल्याने वान नदिला पुर आल्यास मोमिनाबाद रिंगणवाडी दरम्यान कोल्हापुरी बंधाऱ्या वर बांधलेल्या मिनी पुलावर पाणी राहते त्यामुळे मोमिनाबाद उंबर्डी या गावाचा संपर्क तुटतो पिप्री माळेगाव मार्गे जाण्यासाठी मोमिनाबाद उंबर्डी वासियाना चिखलमय रस्ता अभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान होत आहे तसेच या गावात दळण वळणाचे साधन नाही व कोणतीच सुविधा नसल्याने विद्यार्थीना आजारी व्यक्तीला ट्युब वरून जिवघेणा प्रवास करावा लागतो.