वर्धा : केंद्रातील ‘मोदी सरकार’ला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ३० मे ते ३० जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपा पक्षाद्वारे करण्यात आले आहे. राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी ‘मोदी सरकार’च्या कामाचा लेखाजोखा लोकसभा व विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमांतून मांडण्याची सूचना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेश कार्यकारिणी बैठक आटोपल्यानंतर २१ मे रोजी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात अभियानाची माहिती दिल्या जाईल. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात अडीचशे प्रभावशाली किंवा विशिष्ट प्रभावी कुटुंबांसोबत संपर्क साधायचा आहे. यात प्रामुख्याने खेळाडू, कलाकार, उद्योगपती, शहीद कुटुंब अशा घटकांचा समावेश राहील.

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून आणणार; राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन

३१ मेपर्यंत लोकसभा क्षेत्रनिहाय केंद्रीयमंत्री व राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होतील. २९ मे ला राज्याच्या राजधानीत विविध समाज माध्यमांच्या प्रमुखांशी चर्चा होईल. ३० व ३१ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात शुभारंभ रॅली आयोजित आहे. १ ते २२ जूनदरम्यान पत्रकार परिषद तसेच लोकसभास्तरीय संमेलन होतील. २५ जून या ‘आणीबाणी’ जाहीर झालेल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा क्षेत्रात आयोजित सभेत काँग्रेस लोकशाहीसाठी कशी मारक ठरली याविषयी वृत्तपट दाखविल्या जाणार आहे.

हेही वाचा – नागपूर : मुलाला बघताच सैरभैर झालेल्या आईने फोडला हंबरडा; मजुराने घेतला बेपत्ता मुलाचा शोध

याच दरम्यान व्यापारी संमेलन होईल. तसेच विकासकार्यास भेटी देणारा विकासतीर्थ कार्यक्रम, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत चर्चा, लाभार्थी संमेलन, योग दिन असे उपक्रम चालतील. २३ जूनला डॉ. श्यामाकृष्ण मुखर्जी यांच्या पुण्यतिथीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाच्या देशातील दहा लाख बुथवरील केंद्रात दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत. वीस ते तीस जून दरम्यान घर घर संपर्क अभियानातून लोकांना नऊ वर्षांतील केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत माहिती देण्यात येणार आहे. खासदार रामदास तडस म्हणाले की, या उपक्रमांचे योग्य नियोजन केल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various programs organized by bjp between 30th may to 30th june in view of completion of nine years of modi government pmd 64 ssb
First published on: 22-05-2023 at 11:22 IST