संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा: मित्रपक्षांच्या ध्यानीमनी नसताना शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी काल भरलेला अर्ज आणि संध्याकाळी प्रतापराव जाधव यांना जाहीर झालेली उमेदवारी युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला होता. याचे प्रतिबिंब आज बुलढाण्यात पार पडलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उमटले!

अजिंठा मार्गावरील एका छोटेखानी लॉन मध्ये आज शुक्रवारी हा मेळावा पार पडला. राष्ट्रवादी चे नेते आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्याला मावळते खासदार प्रतापराव जाधव, भाजपचे आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, पक्ष निरीक्षक विलास पारकर, माजी आमदार चैनसुख संचेती, नाझेर काझी, टी. डी. अंभोरे, योगेंद्र गोडे, विजय गवई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-महायुती सोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी! शिवसेनेच्‍या दिनेश बुब यांना प्रहारची उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मेळावा आमदार कुटे व गायकवाड यांच्या शाब्दिक जुगलबंदी ने जास्त गाजला. काल अर्ज भरून युतीत खळबळ उडवुन देणारे आमदार गायकवाड यांनी भाषणाची सुरुवातच ‘षटकार’ने केली. आज मी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, अशी सुरुवात त्यांनी केले. यामुळे व्यासपीठ व कार्यकर्त्यांचे कान टवकारले! ते म्हणाले, ‘काल सकाळी मी उमेदवारी अर्ज भरला अन संध्याकाळी ‘जाधव साहेबांचे’ तिकीट फायनल झाले. हे त्यामुळेच झाले, असे सांगून त्यांनी भाजपला चिमटा घेतला. हजर जवाबी नेते आमदार कुटे यांनी आपल्या भाषणात यावर प्रहार केला.’ प्रतापभाऊंचे तिकीट एक महिन्यांपूर्वी च नक्की झाले होते’, असा गौप्यस्फोट करून त्यांनी धमाल उडवून दिली. याची कल्पना आमच्या नेत्यांनी, मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तेंव्हाच दिली होती. यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी च युतीचे संवाद मेळावे दणक्यात पार पडले. ही जुगलबंदी मेळाव्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले.