नागपूर : धंतोली परिसरातील विजयानंद सोसायटी जवळ एक २५ ते ३० वर्षे वयाचा तरुण मृतावस्थेत पडून होता. हा थंडीचा बळी असण्याची शक्यता असली तरी शासकीय रुग्णालयातील उत्तरीय तपासणी अहवालातूनच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

पोलिसांच्या माहितीनुसार, पालतेवार (४७) यांचे विजयानंद सोसायटी, येथे कार डिलरचे दुकान आहे. १२ जानेवारीच्या सकाळी दुकान उघडले असता एक अनोळखी तरुण पडून होता. त्यांनी पोलिसांन सूचना केली. त्या तरुणाला रुग्णालयात हलवले गेले. परंतु त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. थंडीमुळे मृत्यू झाल्याची आहे.

Story img Loader