विदर्भात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; ‘गोसीखुर्द’चे दहा दरवाजे उघडले | Vidarbha rains for third day in a row Ten doors of Gosekhurd opened msr 87 | Loksatta

विदर्भात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; ‘गोसीखुर्द’चे दहा दरवाजे उघडले

मुसळधार पावसामुळे यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली

विदर्भात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; ‘गोसीखुर्द’चे दहा दरवाजे उघडले
(गोसीखुर्द धरणाचे संग्रहीत छायाचित्र)

दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला आहे, असे वाटत असतानाच आणि दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर पुन्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळायला लागल्या आणि नागपुरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यामुळे गोसीखुर्द धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले

मागील तीन दिवसांपासून विदर्भात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील धरणाचे काही दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत तर गोसीखुर्दचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातही थांबलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-07-2022 at 14:18 IST
Next Story
युवतीचे धाडस अन् शिकारी अडकला; पाणकोंबडीची शिकार करणाऱ्यास शिताफीने पकडले