ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारच्या रोजगार व उद्योजकता विभागाच्या ‘महास्वयंम’ पोर्टलवर रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्या विदर्भातील ४१३२ बेरोजगारांपैकी फक्त ३४७ उमेदवारांना नोकरी मिळाली. यात पूर्व विदर्भातील फक्त ३१ जणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अर्धे सत्र संपूनही वसतिगृहातील प्रवेश रखडलेलेच; राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर

ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यात विदर्भातून नागपूर विभागातून २ हजार ४१० तर अमरावती विभागातून १ हजार ७२२ अशा एकूण ४१३२ उमेदवारांचा समावेश होता. यापैकी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून ३१ तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून ३१६ असे एकूण ४४७ जणांना नोकरीची संधी मिळाली. राज्याच्या इतर भागाचा विचार करता पुणे विभाग आघाडीवर आहे. या विभागात १२ हजार ६२२ तरुणांना नोकरी मिळाली. त्यानंतर मुंबई (७ हजार ४९५,) औरंगाबाद विभागाचा (७ हजार ४९५) क्रमांक लागतो. ज्या भागात उद्योग अधिक आहेत त्या भागात रोजगाराच्या संधी अधिक असल्याचे ही आकडेवारी स्पष्ट करते.

हेही वाचा- विश्लेषण: विदर्भात व्याघ्रप्रकल्पांतील वाहने का ठरू लागलीत असुरक्षित?

रोजगाराच्या प्रश्नाने देशात विक्राळ रूप धारण केले आहे. अलीकडेच महाराष्ट्रात येणारे अनेक मोठे उद्योग इतर राज्यात गेल्याने हा प्रश्न अधिक ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

विभाग – नोंदणी – नोकरी

पुणे – २३९२६ – १२,६२२

मुंबई – ७,४९५ – ४,४५५

औरंगाबाद – ५,८७८ – २ ७३९

नाशिक – ४,१७५ – १३६२

अमरावती – १,७२२ – ३१६

नागपूर – २४१० – ३१

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha unemployed struggle to get jobs nagpur dpj
First published on: 21-11-2022 at 12:20 IST