नागपूर: विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाने नुकताच आपला शताब्दी सोहळा साजरा केलेला आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रमुख उपस्थिती होती. या संघाच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अनेकांनी आपल्या शुभेच्छा दिलेले आहेत यात उद्योगपती चित्रपट अभिनेते आणि अन्य क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे.
मात्र प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी यांनी एक व्हिडिओ संदेश जाहीर केलेला आहे. यात संघाच्या शताब्दी वर्षाला शुभेच्छा दिलेले आहेत त्यांचा हा संदेश संघाच्या प्रसिद्ध विभागाकडून जाहीर करण्यात आलेला असून सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.
नागपूर मध्ये संघाचा शताब्दी सोहळा साजरा झाला या कार्यक्रमाला अनेक विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलेली होती. तर अनेकांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून संघाला शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा दिलेले आहेत यात अनेक क्रीडापटू आणि चित्रपट अभिनेत्यांचा समावेश आहे. सर्वांनीच संघाच्या कार्याचे कौतुक केलेले आहे. तसेच राष्ट्र निर्मानात संघाचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे हा संदेशही दिलेला आहे. शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जनतेला आव्हान करत पर्यावरण समरसता या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच हिंसाचाराने कुठलाही न्याय मिळणार नसून लोकशाही हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचा संदेश दिला होता.
काय म्हणाले तमन्ना आणि विक्रांत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तमन्नाने सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे राष्ट्र निर्माण अभूतपूर्व असे काम आहे. जगभरात प्रसिद्ध असलेलं संघटना १०० वर्ष पूर्ण करत असल्याचा आनंदही तिने व्यक्त केला. तर विक्रांत ने संघ हे स्वयंशिस्त आणि तरुणांना देश प्रेमाचे धडे देणारे मोठे संघटन असल्याचा संदेश दिलेला आहे. संघाच्या या कार्याचे त्याने तोंड भरून कौतुक केले. देशाच्या उभारणीत संघाचे मोठे योगदान असून एखाद्या संघटन त्यांची शंभर वर्ष पूर्ण करतो ही आनंदाची बाब असल्याचाही तो म्हणाला.