नागपूर: नागपुरातील न्यू सुभेदार लेआऊटमध्ये शिवसेनेतर्फे शनिवारी आयोजित तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी ( आकोडा टाकून वीज घेतली): केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
शनिवारी आदित्य ठाकरे नागपूर दौ-यावर होते.

या निमित्ताने शिवसेनेतर्फे नवीन सुभेदार लेआउट परिसरात तान्हा पोळ्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठामागील विजेच्या खांबावरून वीज चोरी करण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला. विजेच्या दोन खांबा दरम्यानच्या तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचे दिसून येते.

हेही वाचा : अकोला : पोलिसांच्या दबावामुळे युवकाची आत्महत्या?, मृत्यूपूर्वीची चित्रफित प्रसारित

दरम्यान, ही वीज चोरी नेमकी आयोजकांनी केली की मंडप सेवा पुरवणाऱ्या पुरवठादाराने हा प्रश्न अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी नागपुरातील गजानन नगर परिसरात शिवसेना नेते संजय राऊत यांची सभा झाली होती. तेव्हाही सभेसाठी जवळच्या खांबावरून वीज चोरल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महावितरणने आयोजकांवर दंडही ठोठावला होता.

हेही वाचा : फडणवीसांच्या नागपुरात आदित्य ठाकरेंचे दणक्यात स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारच्या कार्यक्रमातील वीज चोरीच्या समाज माध्यमातील व्हायरल व्हिडियोबाबत विचारणा केली असता महावितरण अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. चौकशी नंतर वीज चोरी प्रकरणात महावितरणने संबंधित मंडप कंत्राटदारावर ९७६० रुपये दंड आकारला असून दंडाची रक्कम वसूल केली आहे.