लोकसत्ता टीम

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट नादुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले होते. बुलढाणा शहरातील एका केंद्रावर अर्धा तास खोळंबा झाल्याने यंत्रणांची धावपळ झाली. यामुळे हजारो मतदारांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारसंघातील विविध केंद्रांवर २६ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट, तर २५ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्यामुळे मतदानात खोळंबा निर्माण झाला होता. मात्र यंत्रणांनी पर्यायी संयंत्र लावल्यावर मतदान सुरुळीत झाले. दुसरीकडे प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी केंद्राध्यक्ष मतदान मॉक ड्रिल घेतात. या तालीम दरम्यान २४ बॅलेट , १२ कंट्रोल युनिट तर २२ व्हीव्हीपॅट बिघडल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही यंत्रे बदलून घेतल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली.

आणखी वाचा-नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाणा येथील बसस्थानक समोरील प्रशासकीय इमारत मतदान केंद्र क्रमांक १९९ येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. परिणामी, मतदान खोळंबले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. मोताळा तालुक्यातील कोराला बाजार केंद्रावरदेखील असाच प्रकार घडला होता.