वर्धा : राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा १६ जून रोजी सूरू होणार असल्याचे परिपत्रक निघाले आहे. म्हणून पालक आपल्या पाल्यांना घेऊन पुस्तक खरेदीसाठी घराबाहेर पडताहेत. काल रविवार असल्याने मोठी झुंबड उडाली होती. पण हवे ते पुस्तक मिळेचना. कारण कोणती पुस्तके हवी याची यादी पालकांना देण्यात आली होती. शाळा सूरू होण्यास काहीच दिवस बाकी. म्हणून पुस्तक खरेदीची झुंबड. पण हवी ती पुस्तकेच बाजारात नव्हती.

बालभारती ही संस्था चालू वर्षासाठी पुस्तके प्रकाशित करण्यास जबाबदार. त्यांनी तशी ती छापली. पूर्वी शिल्लक असलेली इंटींग्रेटेड म्हणजे पुस्तकास कोरी पाने असलेली व पण तशी भूमिका रद्द झाल्याने कोरी पाने नसलेली व फक्त अभ्यासक्रम असलेली पुस्तके, यापैकी कोणती घ्यावी असा प्रश्न. कारण दिलेल्या यादीत गतवर्षिचीच नोंद होती. म्हणून तशीच पुस्तके मिळावी, असा पालकांचा आग्रह. पण शालेय शिक्षण विभागाचा आदेश गोंधळ निर्माण करून गेला. कारण यावर्षी कोरी पाने नसणार असा आदेश तर यादी मिळाली ती जुन्याच कोरी पाने असलेल्या पुस्तकांची. यावर्षी इंटींग्रेटेड पुस्तके मिळणार नव्हती. मात्र बालभारती संस्थेकडे मागील निगमानुसार छापण्यात आलेल्या पुस्तकांचा व यावर्षी छापण्यात आलेल्या पुस्तकांचा साठा पण उपलब्ध होता. पण यापैकी कोणते घ्यावे, असा प्रश्न. म्हणून प्राप्त जुन्या यादीचा हट्ट पालक धरून बसले आणि बाजारात गोंधळास सुरवात झाली. हवे ते मिळत नाही म्हणून पालक माघारी फिरत असल्याचे चित्र आहे.

विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप म्हणतात की खरे काय ते समजून नं घेतल्याने गोंधळ सूरू आहे. पण अपेक्षित साठा उपलब्ध असून पालकांनी मुख्याध्यापकांशी बोलून घ्यावे, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालभारती संचालक कृष्णकुमार पाटील म्हणाले की दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा साठा पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. यावर्षी विषयनिहाय पुस्तके आदेशानुसार आम्ही छापली. मात्र कोरी पाने असलेल्या पुस्तकांचा पण साठा होताच. ती पण विक्रीस आली. आणि कंटेन्ट सारखेच आहे. बदल नाही. जूना साठा वाया जाऊ नये म्हणून आम्ही त्या पुस्तक खरेदीवर ५ टक्के सूट दिली आहे. कोणतेही खरेदी करता येईल. नाहक गोंधळ नको. आता विभागीय पुस्तक साठ्याबाबत अहवाल घेत आहात. इंग्रजी माध्यमाची मोठी पुस्तक खरेदी पण पालकांनी केली, असा खुलासा पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.