वर्धा : जिल्ह्यात श्वानदंशच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून जानेवारी ते जुलै या सात महिन्यामध्ये २ हजार ६०७ नागरिकांना श्वान चावल्याची नोंद शासकीय रुग्णालयात आहे. पण अनेकांना तातडीने औषधोपचार आणि उपचार मिळाल्याने यात कुणाचाही जीव गेला नाही, हे विशेष!
वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहेत. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रमुख मार्गावर, चौकात, शहराच्या मध्यवर्ती भागात, प्रमुख चौकामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचाही रात्री-बेरात्री ,तसेच सकाळच्या सुमारास मोकाट कुत्रे पाठलाग करतात, असे निरीक्षण पशुप्रेमी अविनाश टाके यांनी सांगितले.
आर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधीजी चौक, आठवडी बाजार, पदमावती चौक, नेहरू मार्केट, गुरुनानक धर्मशाळा, जनता नगर, जाजूवाडी, बसस्थानक या परिसरात कुत्र्यांनी ठिय्या मांडल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
अनेक विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पालक वर्ग धास्तावला आहेत. कुत्रा चावल्यानंतर रेबीज ची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. त्यामुळे या बाबतीत नागरिकांनीहीसुद्ध स्वतःची काळजी घेणे गरजेचे झाले आहेत. वस्तुतः रेबीज हा एक व्हायरस म्हणजेच विषाणू जन्य आजार आहेत.
विषाणू शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नवर्हस सिस्टीम वर म्हणजेच मज्जा संस्थेवर हल्ला करतो, त्यामुळे रुग्णांच्या डोक्यात मणक्यात सूज येते. यामध्ये ताप आणि अंगदुखी होणे, मेंदू आणि मनक्यात सूज येणे, स्नायू हळूहळू कमकुवत होणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसु लागतात.
श्वान दंश आकडेवारी
जानेवारी २५ —- ५३९
फेब्रुवारी २५ —- ४२२
मार्च २५ —- ३५३
एप्रिल २५ — ३३७
मे २५ ——- ३०४
जून २५ —– ३१४
जुलै २५ — ३०६
संपूर्ण वर्धा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस चालू असून, अनेक वाहनधारकांना रात्री प्रवास करताना या कुत्र्यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मलासुद्धा दुचाकीवरून जात असतांना मोकाट कुत्र्यांनी माझ्या दुचाकीवर हल्ला केला आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा, अशी मागणी आर्वीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश शिरभाते यांनी केली.
मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार नेहमीच घडत असुन यामध्ये दिवसोदिवस वाढ होत आहेत. कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर रेबीज प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहेत. तसेच अनेक शासकीय व काही खाजगी रुग्णालयात रेबीज प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुत्रा चावल्यानंतर लस घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करू नये.
आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहेत. तसेच मोकाट व भटक्या कुत्र्याचेही लसीकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहेत, अशी मत डॉ. श्यामसुंदर भुतडा यांनी व्यक्त केले.
आपल्याला कुत्रा चावला की आपण घरी गावरान उपचार करु नयेत. तांत्रिक बाबा यांच्या कडे न जाता,थेट डॉक्टराकडे जावून तातडीने औषधोपचार करून घ्यावा. त्यासाठी कुत्र्यांनी चावा घेतल्यावर रेबीज प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहेत. तसेच कुत्रा चावल्यानंतर कोणतिही हयगय न करता, नागरिकांनी दवाखान्यात जाणे आवश्यक ठरते, अन्यथा भविष्यात रुग्णांना त्रास होवू शकतो. त्यासाठी रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत उपचार मिळू शकतो, असे रेडक्रॉसचे डॉ. अरुण पावडे यांनी सांगितले.