वर्धा : ई ऑफिस प्रणाली हा तर आता परवलीचा शब्द झाला आहे. पण त्याचे विकेद्रीकरण मात्र अपेक्षित असे झालेले नसल्याचे चित्र दिसून येते. वर्धा जिल्हा मात्र यात गतिमान ठरत असून तालुका पातळीवर असे संगणक संचालित कार्यालय कार्यरत होऊ लागले आहेत. वर्धा उपविभागीय कार्यालय असे सक्षम झाल्यानंतर आता आर्वीतही सुरुवात झाली असून कारंजा व आष्टी तालुक्यात प्रारंभ होत आहे. हेही वाचा >>> बुलढाणा : प्रक्षोभक भाषण, जातीय व सामाजिक तेढ वाढवल्याचा आरोप; हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंसह अठरा जणांविरुद्ध गुन्हे एखाद्या विषयाची फाइल पूर्णपणे ऑनलाइनच सादर केल्या जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रणाली होतीच. आता तालुका स्तरावरही प्रणाली कार्यरत करीत जनतेला जलद न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. सुरुवातीला शासनाच्या महाआयटीतर्फे मंत्रालयात ही व्यवस्था झाली. त्यानंतर सर्व जिल्हाधिकारी कार्यालये या प्रणालीने जोडल्या गेलीत. तालुका पातळीवर मात्र वर्धा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सर्व आठही तालुके या ई ऑफिसने जोडण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.