वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसमद्ये उभी फूट पडल्यानंतर कोण, कोणाच्या पाठीशी याची गणती सुरू झाली असून बडतर्फीच्या कारवाईला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची थेट अजित पवार यांना झोंबणारी टीका चर्चेत आहे.

हेही वाचा… गोंदिया: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा फलकांवर शरद पवारांचा फोटो; चर्चांना उधाण…

हेही वाचा… चंद्रपूर: मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस शिपाई निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांदिले आज हिंगणघाट, समुद्रापुर मतदारसंघातील प्रमुख शंभर पदाधिकारी सोबत घेत मुंबईकडे शरद पवार यांच्या समर्थनार्थ निघाले आहे. शरद पवार हेच आधार आहेत. ते शंभर अजित पवार तयार करू शकतात. हीच या भागात भावना आहे. लोकांचा कल पाहून ५ जुलैला मुंबईत होणाऱ्या सभेत आम्ही सहभागी होत आहोत. शरद पवार हेच पक्षाचे तारणहार आहेत, असा दावा वांदिले यांनी केला. आज ते व प्रमुख पदाधिकारी रवाना होत असल्याने शरद पवार यांचे उघड खंदे समर्थक म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली आहे.