अकोला : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी अडचण होणार आहे.

अकोला ते महान मुख्य जल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान २५ एमएलडीवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. शहरातील शिवनगर, आश्रयनगर व बसस्थानकामागील जलकुंभ अंतर्गत शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापूर जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच ६५ एमएलडी प्रकल्पावरील होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामध्ये महाजनी जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशवनगर जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगानगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ, गुडधी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या भागांचा समावेश आहे.

हेही वाचा – वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाचे एकीकडे आश्वासन तर दुसरीकडे नियुक्तीचे धोरण असल्याने संभ्रम

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींनी भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र काही लोक…” उपराष्ट्रपती धनखड यांचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.