नागपूर: नागपूर महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीने जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२ सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोन मधील त्रिमूर्ती नगर जलकुंभ ३० नोव्हेंबर (बुधवार) आणि प्रताप नगर जलकुंभ २ डिसेंबर (शुक्रवार ) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. जलकुंभ स्वच्छता दरम्यान टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भागात पाणी येणार नाही

लक्ष्मीनगर झोन: त्रिमूर्ती नगर जलकुंभ (३० नोव्हेंबर-बुधवारी) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : सोनेगाव, पन्नास ले आउट , इंद्रप्रस्थ नगर , मनीष ले आउट, सहकार नगर, गजानन धाम, ममता सोसायटी, समर्थ नगरी, एचबी इस्टेट , मेघदूत विला ,वाहने ले आउट, सीजीएचएस कॉलोनी, स्वागत सोसायटी, प्रसाद सोसायटी, पॅराडाइझ सोसाटी, शिवशक्ती ले आउट, पाटील ले आउट, अमर अशा सोसाटी, भामटा, जय बद्रीनाथ सोसाटी, भोगे ले आउट, आदिवासी सोसाटी, लोकसेवा नगर, साईनाथ नगर , गुडधे ले आउट, इंगळे ले आउट, प्रियदर्शनी नगर, भुजबळ ले आउट, त्रिमूर्ती नगर, सोनेगाव वस्ती, भेंडे ले आउट, वेल कम सोसायटी , साई नाथ नगर , नासुप्र ले आउट.

हेही वाचा: एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई

प्रताप नगर जलकुंभ (२ डिसेंबर -शुक्रवारी ) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :खामला जुनी वस्ती, सिंधी कॉलोनी, वेंकटेश नगर , गणेश कॉलोनी, मिलिंद नगर, प्रताप नगर, टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर, लोकसेवा नगर , वागणे ले आउट, पायोनियर सोसायटी, खामला , त्रिशरण नगर , जीवन छाया नगर , संचायानी वसाहत , पूनम विहार , स्वरूप नगर, हावरे ले आउट, अशोक कॉलोनी, शास्त्री ले आउट, मालवीय नगर, गौतम नगर, शिव नगर, सर्वोदय नगर, कोतवाल नगर आणि विद्या विहार कॉलोनी आणि इतर भाग .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply will remain shut in nagpur for the next three days tmb 01
First published on: 29-11-2022 at 15:26 IST