लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरेगावचा समावेश असलेल्या पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवारी २४ तासासाठी पाणी पुरवठाबंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या काही भागात २४ तासांसाठी १०० टक्के पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम मंगळवार, २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरू राहणार आहे. या कालावधीत काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा-मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

या भागात १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार

  • पी दक्षिण (गोरेगाव) – वीटभट्टी, कोयना वसाहत, स्कॉटर्स वसाहत, कामा इंडस्ट्रीयल इस्टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्टेट
  • पी पूर्व (मालाड पूर्व) – दत्त मंदिर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदिर, वसंत व्हॅली
  • आर दक्षिण (कांदिवली) – बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व)
  • गोरेगावमधील पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्वेश्वर मार्ग, प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत येथे बुधवारी पाणी येणार नाही.
  • मालाड पूर्वमधील पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्वप्नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग येथेही बुधवारी पाणी येणार नाही.

Story img Loader