नागपूर: भारतात विदेशी गुन्हेगारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ६ हजार ६२२ विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल झाले असून बांगलादेश, नायजेरिया आणि म्यानमार या देशातील सर्वाधिक गुन्हेगार आहे. नायजेरिया देशातील आरोपींवर अंमली पदार्थ विक्रीचे सर्वाधिक गुन्हे आहेत तर बांगलादेश, रशिया, श्रीलंका या देशातील सर्वाधिक महिला-तरुणींवर देहव्यापाराशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. विदेशी नागरिकांवर दाखल गुन्ह्यांमध्ये पश्चिम बंगाल पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या तीन वर्षांत तब्बल ६ हजार ६२२ विदेशी गुन्हेगारांची नोंद वेगवेगळ्या राज्यात करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कोलकतामध्ये सर्वाधिक १६४३ विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल झाले . दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (७६७) आणि तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात एकूण ४१२ विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १४९ विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा… अपहृत मुलीचा तब्बल सात वर्षांनंतर शोध, अज्ञाताने फुस लावून गुजरातला…

सर्वाधिक विदेशी गुन्हेगारांमध्ये रशिया, पाकिस्तान, श्रीलंका, नायजेरिया, चीन, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, इरान, जपान, इटली, स्विडेन, कॅनडा या देशातील नागरिकांचा समावेश आहे. अंमली पदार्थ विक्रीत नायजेरिया, बांगलादेश आणि श्रीलंकेतील गुन्हेगारांचा समावेश आहे. सेक्स रॅकेटमध्ये रशिया, अफगाणिस्तान, उजबेकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील तरुणी, महिलांचा समावेश आहे.

गुन्ह्यात विदेशी महिलांचाही माेठा सहभाग

हेरगिरी करणे, बनावट पारपत्र तयार करणे, देहव्यापार, बनावट ॲप्सच्या माध्यमातून पैसे हडपणे अशा काही गुन्ह्यांमध्ये विदेशी महिलांचा समावेश आहे. विदेशातील ३६४२ गुन्हेगारांमध्ये ६८३ महिलांचा समावेश आहे. २० आरोपी खून, १५ आरोपी बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात ६ तर अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात ५१० विदेशी गुन्हेगारांचा समावेश आहे.

’टॉप १३’ विदेशी गुन्हेगार

देशगुन्हेगार
बांगलादेश१८३९
नायजेरिया६४०
म्यानमार३१०
नेपाळ२६६
आफ्रिका१७६
श्रीलंका४७
पाकिस्तान४४
इराण३२
चीन२२
रशिया२०
अमेरिका१३
अफगाणिस्तान१३
येमेन११