नागपूर : एकविसावे शतक म्हणजे तंत्रज्ञानाचे युग, त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या आगमनाने तर अशक्य गोष्टीही क्षणात पूर्ण करणे शक्य झाले आहे. एआयचा वापर करून एखाद्या परिपक्व चित्रकाराप्रमाणे सुंदर चित्र काढता येते तर क्षणात कोणत्याही विषयावर मुद्देसुद निबंध लिहिता येते. एखादा फोटो तयार करणे असो की, व्हिडीओ, काही क्षणातच एआयच्या माध्यमातून तयार केले जाऊ शकतात. मात्र एआयच्या या वेगवान गतीमुळे आजच्या काळात खरे काय किंवा खोटे काय? काय मानवनिर्मित आहे आणि काय एआयद्वारा तयार हे ओळखणे कठीण झाले आहे. असे असले तरी पुढील काही पर्यांयांचा वापर करून आपल्याला हा फरक ओळखता येतो.
या टूल्सचा वापर करा
आजच्या काळात लोकं स्वतः मेहनत करून कंटेंट लिहिण्यापेक्षा एआयची मदत घेतात. चॅटजीपीटी सारख्या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकता. पण यामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. माहिती एआयने लिहिली आहे की एखाद्या व्यक्तीने, हे समजणे फार अवघ़ड आहे. जर कोणी तुम्हाला चॅटजीपीटीने लिहिलेला कंटेंट शेअर केला, तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, कंटेंट एआयने लिहिला आहे की माणसाने, हे कसे ओळखावे? ही समस्या एआयने निर्माण केली आहे तर त्याचे उत्तर देखील एआय तंत्रज्ञानातच आहे.
सध्या असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने आपण हा फरक ओळखू शकतो. यात Originality.ai, GPTZero, Copyleaks Al Content Detector, Sapling Al Detector आणि Writer.com सारखे एआय टूल्सचा समावेश आहे. या टूल्समध्ये तुम्हाला कंटेंट केवळ पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटेंटबद्दल माहिती मिळते. एआय हा भ्रम निर्माण करतो त्यामुळे जर कोणत्याही अहवालात, संशोधनात किंवा वेबसाइटमध्ये सांगितलं असेल की संबंधित माहिती एआयने दिली आहे, तर इंटरनेटवर क्रॉस चेक करा आणि ती माहिती किती बरोबर आहे ते पहा.
एआयबाबतचे फॅक्ट शिवाय प्लेजरिज्म तपासणंदेखील तितकेच गरजेचे आहे. सहसा, एआय कंटेंट ओरिजिनल असतो, मात्र काहीवेळा इंटरनेटवर उपलब्ध असलेला कंटेट एआयमध्ये कॉपी केला जातो. तुम्ही प्लेजरिज्म तापसण्यासाठी Grammarly, Quetext आणि Turnitin सारख्या टूल्सची मदत घेऊ शकता. आजच्या डिजीटल काळात सर्वांसाठी एआय एक चांगला साथीदार बनला आहे. मात्र यावर डोळे झाकून विश्वास न करता याची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे.