लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्राच्या दृष्टीने आता सत्तेत सहभागी असणाऱ्या नेत्यांनी कुठलेही विधाने करण्यापूर्वी मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोणाला व्हायचे आहे याबाबतचे विधान करण्यापूर्वी आपण सत्तेत आहोत याचे भान ठेवले पाहिजे. छगन भुजबळ जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना मी सल्ला देण्याची गरज नाही, असे मत महसूल मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. विखे पाटील नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-“संजय राऊत यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर, हे त्यांनाच ठाऊक” देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ते स्वत:च मदारीच्या भूमिकेत असल्यामुळे आणि मदारी मजेत असल्याने त्यांना त्यांच्याच पक्षातील लोक माकड वाटत असणार. राज्याचा कारभार उत्तम सुरू आहे, एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही लोकसभेसह अन्य निवडणुका लढणार आहोत. सिरसाठ यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. यापूर्वी विदर्भातील ५० ते ६० टक्के पद कायम रिक्त असायचे. पहिल्यांदा विदर्भातील ९५ टक्के रिक्त पदे भरलेली आहेत. ज्यांना हजर न होण्याची जुनी सवय आहे, अशा सात उपजिल्हाधिकारी आणि निवासी तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. गरज पडल्यास अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करू, असेही विखे पाटील म्हणाले.