नागपूर : भारतीय सशस्त्र दलाचे दुसरे दलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान हे शनिवारी पहिल्यांदाच नागपूर शहरात आले. त्यांनी येथील झिरो मॉईलला भेट दिली.

संरक्षण दलातील हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे पद आहे. सीडीएस चौहान यांच्यापूर्वी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांनीदेखील नागपूरला भेट दिली होती. या पदावरील व्यक्ती नागपुरात वारंवार भेटी का देतात, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

हेही वाचा – बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस गजानन महाराज चरणी नतमस्तक; विविध उपक्रमांची घेतली माहिती

सीडीएस चौहान यांनी शनिवारी हवाई दलाच्या नागपुरातील मेंटनन्स कमान मुख्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच अमरावती मार्गावरील सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला भेट दिली. ही कंपनी संरक्षण दलास संरक्षण सामुग्रीचा पुरवठा करते. बिपीन रावत यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी शहराच्या भेटीदरम्यान, त्यांनी येथे सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने तयार केलेल्या शस्त्रास्त्रयुक्त ड्रोन (हेक्साकॉप्टर) आणि लॉइटरिंग युद्धसामग्रीचे प्रात्यक्षिक पाहिले होते. त्यांचे अपघाती निधन झाले.

हेही वाचा – गडचिरोली : धक्कादायक! अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; दोन शिक्षकांसह तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर जनरल चौहान यांची सीडीएसपदी नियुक्ती झाली. त्यांनी शनिवारी नागपुरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. परंतु त्यांची प्रमुख भेट अमरावती मार्गावरील सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज होती. त्यांनी तेथे ३० एमएम ॲम्युएशन आणि एका छोट्या रॉकेट मोटारचे प्रात्यक्षिक बघितले.