लोकसत्ता टीम

चंद्रपूर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा शेतशिवारात घडली. सायत्राबाई नामदेव कामडी, असे मृत महिलेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा गावातील शेतात सायत्राबाई काम करण्यासाठी गेल्या होत्या. हा परिसर जंगलव्याप्त असून येथे वन्यप्राण्यांचा वावर आहे. सायंकाळी घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-नागपूर : हत्याकांडातील आरोपीचा ‘लॉकअप’मध्ये आत्महत्येचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हळदा शेतशिवारात सध्या पीक कापणी सुरू आहे. यासाठी महिला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत जीव मुठीत घेवून शेतात काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. चिमूर तालुक्यात गेल्या चौवीस तासात वाघांच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या असून यात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.