scorecardresearch

नागपूर : जागतिक दर्जाचे उद्यान नागपुरात साकारणार : गडकरी

शहरात जागतिक दर्जाचे एक मोठे उद्यान साकारणार आहे. त्यात १५९ जातींचे कमळ पुष्प व २५० जातींचे गुलाब असतील.

नागपूर : जागतिक दर्जाचे उद्यान नागपुरात साकारणार : गडकरी
( केंद्रीय मंत्री नितीन गडकरी )

शहरात जागतिक दर्जाचे एक मोठे उद्यान साकारणार आहे. त्यात १५९ जातींचे कमळ पुष्प व २५० जातींचे गुलाब असतील. या उद्यानामुळे नागपूरच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हनुमान स्पोर्ट्स ॲकेडमी व जे. डी. स्पोर्ट्स यांच्यातर्फे ‘स्वीमथॉन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी, डॉ. उगेमुगे उपस्थित होते. शहरात दिव्यांगांसाठीही एक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने जागा दिली आहे. १० ते १२ कोटींचा निधी केंद्र शासन देत आहे. येथे ब्रेन लिपित लिहिलेल्या विविध गोष्टी असतील.

दररोज एक लाख विद्यार्थी मैदानावर खेळले पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात आता खेळाचे मैदाने तयार करण्यात येत आहेत. या मैदानावर खेळण्याची संधी त्या त्या भागातील खेळाडूंना मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या