मुरादपूर (ता. चिखली ) येथे काल, मंगळवारी अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, बुधवारी अस्वलाच्या हल्ल्यात एक युवा शेतकरी जखमी झाल्याची घटना डोंगरशेवली शिवार येथे घडली. जखमीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हेही वाचा >>> नागपूर : नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
राहुल राम भुतेकर (२२, रा. डोंगर शेवली, ता. चिखली) असे जखमी युवकाचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजता तो डोंगरशेवली-किन्होळा रोडवरील आपल्या शेतात काम करत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. सुदैवाने आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने अस्वल पळून गेले. त्यामुळे युवक बचावला. परंतु, या घटेमुळे गावकरी भयभीत झाले आहेत.