शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या वसतिगृह क्रमांक पाचमध्ये गळफास लावून एका तरुणाने शनिवारी रात्री आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने वसतिगृहातील एका मित्रासोबत जवळच्या बिअरबारमध्ये मनसोक्त दारू प्राशन केली होती. व्यवसायोपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षेत वारंवार अनुत्तीर्ण होण्यासह प्रेम प्रकरणामुळे नैराश्य आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये आहे.
रोशन उत्तमराव शिरसाट (२६) रा. गल्ली नं. १७, कुकडे लेआऊट, कौशल्यानगर, असे मरण पावलेल्याचे नाव आहे. त्याने व्यवसायोपचार अभ्यासक्रमाकरिता २००७ ला मेडिकलमध्ये प्रवेश घेतला होता. तो वारंवार अनुत्तीर्ण होत होता. यामुळे तो निराश होता. त्याची एका मुलीसोबत मैत्री होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.
एका मित्रासोबत मेडिकल चौकातील एका बिअर बारमध्ये दारू प्राशन केली. दोघेही मेडिकलच्या वसतिगृहात परतले. मित्र पार्सल घेण्यासाठी गणेशपेठ बसस्थानकावर निघून गेला. तो रात्री १०.३० वाजताच्या सुमारास परतल्यावर त्याला खोलीचे दार आतून बंद दिसले. त्याने खिडकीतून डोकावले असता रोशन हा गळफास लावलेल्या स्थितीत लटकलेला आढळला. त्याने ही माहिती मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वार्डन डॉ. समीर गोलावार यांना दिली. डॉ. गोलावार यांनी अजनी पोलिसांनाही सूचित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला.
तरुणाने आत्महत्या केलेल्या मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक ५ मधील खोली क्रमांक ४६ मध्ये एकही विद्यार्थी राहायला तयार नाही. मेडिकलमध्ये आधीच विद्यार्थ्यांच्या राहण्याकरिता खोल्या कमी असल्याने येथील विद्याथ्यार्ंची व्यवस्था आता करायची कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2016 रोजी प्रकाशित
‘मेडिकल’च्या वसतिगृहात तरुणाची आत्महत्या
मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक ५ मधील खोली क्रमांक ४६ मध्ये एकही विद्यार्थी राहायला तयार नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-08-2016 at 02:42 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man commit suicide in government medical college hostel