लोकसत्ता टीम

अकोला : शासकीय योजनांच्या माहिती फलकावरील ‘मोदी’ शब्दाला युवक काँग्रेसने विरोध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेल्या योजनांच्या फलकांवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मोदी’ शब्दावर भारत शब्द लावून मंगळवारी दुपारी निषेध व्यक्त केला.

Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
mumbai municipal corporation marathi news, model code of conduct marathi news,
आचारसंहिता लागल्यामुळे पालकमंत्र्यांच्या पालिकेतील हस्तक्षेपावरही मर्यादा
Rahul Gandhi
ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…

आणखी वाचा-गडचिरोलीत पुन्हा धान खरेदी घोटाळा?

केंद्रातील तसेच राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भारत सरकार ऐवजी मोदी सरकार या नावाने भाजपचा प्रचार करीत आहेत, असा आरोप युवक काँग्रेसने केला. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या फलकावर मोदी सरकार असा उल्लेख खोडून त्यावर भारत सरकार हे शब्द लावण्यात आले. यावेळी भाजपचा निषेध करण्यात आला केला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.