बुलढाणा : पत्नीला आणायला गेलेल्या लोणार (जिल्हा बुलढाणा )येथील युवकाची पालघर शहरात क्रूरपणे हत्या करण्यात आली. केवला मोबाईल आणि जवळील पैसे दिले नाही म्हणून दोन अट्टल गुन्हेगारांनी त्याचे जीवन संपविल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे पालघर सर लोणार मध्ये खळबळ उडाली आहे.

लोणार तालुक्यातील येवती या गावातील या युवकाचा पालघर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर युवकास दोन आरोपींनी चाकूचे वार करुन जखमी केले होते. ही घटना गुरुवारी १ जानेवारी रात्री घडली. मृतक युवकाचे नाव महादेव घुगे (वय ३० ) असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : विमान चुकल्यामुळे ‘एम्स’मध्ये प्रवेश हुकला ,न्यायालयाने…

प्राप्त माहिती नुसार येवती येथील  युवक महादेव घुगे यांचे दोन महिन्यापूर्वीच पालघर मधील खानपाडा येथील एका युवतीशी लग्न झाले होते. विवाहानंतर पत्नीची प्रकृती  बिघडल्याने ती काही दिवसासाठी माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी महादेव नव्यावर्षात सासरी  पोहचला होता. रात्री जेवन झाल्यावर महादेवने आपल्या सासु व सासऱ्याला आपण फेरफटका मारण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले.

दरम्यान महादेव फिरत फिरत शहरातील हुतात्मा स्मारक (स्तंभ) परिसरात पोहचला.  यावेळी परिसरात आधीच उपस्थित असलेले अनीस खान( वय २५ )व राजू वाघारी (वय २३) या दोघांनी महादेवला हटकले. यावेळी दोघांनी महादेवला चाकूचा धक दाखवत त्याच्या जवळील रक्कम व मोबाइल  मागितला.  महादेवने नकार दिल्याने दोघांनी महादेव सोबत वाद घातला.यावेळी रागाच्या भारत दोन्ही आरोपींनी चाकूने सपासप  वार केल्याने महादेव गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत महादेवने कसेबसे पोलिस ठाणे गाठले.

हेही वाचा >>>महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत प्रथम पालघर येथे भरती केले, परंतू महादेव अत्यावस्थ असल्याने त्याला पुढील उपचाराससाठी सिल्वासा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. या ठिकाणी गुरुवार  २ जानेवारी रात्री महादेवचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी अनीस खान व राजू वाघारी या  दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हात्ये प्रकरणी  पोलिसांनी हुतात्मा स्तंभ परिसरातून राजू वाघारी याला तर घटनास्थळावरुन पसार झालेल्या  अनीस खान यास भोईसर येथील गांधीपाडा मधून  अटक केली. दोन्ही आरोपी हे अटटल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.  पोलिस उपअधिक्षक सतीश धाराशीवकर, पालघरचे  ठाणेदार अनंत पराड यांनी ही माहिती दिली.