नागपूर : पारडी येथील एक २५ वर्षीय तरुण फेसबूक, व्हाॅट्सॲपवर बनावट खाते तयार करून तरुणींना आकर्षित करत होता. त्यानंतर तरुणींना भेटून त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. तरुणीच्या तक्रारीवरून तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना चौकशीत या तरुणाने इतरही तरुणीसोबत असे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे.

हेही वाचा –  ‘या’ तीन कंपन्यात निधी गुंतवण्यापासून सावध रहा, कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे निर्देश

हेही वाचा – नागपूर:  राज्यात पोलिसांविरोधातच तक्रारी वाढल्या; पाच वर्षांत चार हजारांवर तक्रारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय उर्फ संजय देवानंद भानारकर (२५) रा. पारडी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीला फेसबूक, व्हाॅट्सॲपवरून नोकरीवर लावून देण्याच्या बहाण्याने पारडीला बोलावले. येथे त्याने तिचा हात पकडला. तिने प्रतिकार करत पारडी पोलीस ठाणे गाठले. त्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी तरुणाचा सीडीआर काढला असता त्याने यापूर्वीही बऱ्याचदा हा प्रकार करून बऱ्याच मुलींची अश्लील छेड काढल्याचेही प्रथमदर्शनी पुढे येत आहे. पोलिसांच्या सखोल तपासात हा सर्व प्रकार येण्याची शक्यता असून, तरुणी व विद्यार्थिनींनी असल्या नोकरीच्या आमिशाला बळी पडू नये व पोलिसांना तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.