18 August 2019

News Flash

तंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..

तंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे

ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे संशोधन
कर्करोगासाठी कारणीभूत मानला जाणारा तंबाखूच कर्करोगाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे नवे संशोधन समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ुट फॉर मॉलिक्युलर सायन्स’च्या वैज्ञानिकांनी तंबाखूच्या रोपातील फुलात हा अणू असल्याचे शोधून काढले आहे. याच संशोधनाचा आधार घेत लाखलाखोळी डाळीसंदर्भात लढा देणारे वैज्ञानिक डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. स्वास्थीचरण यांना पत्र लिहिले आहे.
तंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे. या संशोधनानुसार तंबाखूच्या रोपामध्ये आढळणारा एक अणू मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशींना संपविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तंबाखूच्या रोपाला येणाऱ्या फुलांमध्ये तो असतो. त्यात कर्करोगाच्या विषाणूला नष्ट करण्यासोबतच कर्करोगाच्या पेशींना ओळखण्याची आणि त्याला मारण्याची क्षमतासुद्धा आहे. या अणूला ‘एनटी-१’ असे नाव देण्यात आले आहे. ‘इ-लाईफ जर्नल’ मध्ये हा संपूर्ण शोधप्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यातील प्रमुख संशोधक मार्क हुलेट यांच्या मते तंबाखूत एक खास पदार्थ विकसिीा होतो, जो केवळ कर्करोगावर मारा करतो. मनुष्याच्या शरिरातील पेशींवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. या संदर्भात कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या विशेषज्ञांसोबतचा एक अभ्यासदेखील कोलेरॅडोच्या एन लेंडमेन यांनी प्रकाशित केला आहे. ऑस्ट्रेलियातील या विद्यापीठाच्या संशोधनानंतर डॉ. शांतीलाल कोठारी यांनीही ८० टक्याहून अधिक लोकांना वर्षभर कायमस्वरूपी रोजगार तंबाखूच्या उत्पादनामुळे उपलब्ध होईल, असे सांगितले. मुळात तंबाखू वाईट नाही, पण त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनात इतरही घातक घटक मिसळले जात असल्याने त्याचे परिणाम वाईट होतात. तंबाखू आरोग्याला हानीकारक म्हणून मोठमोठय़ा जाहिराती केल्या जातात, पण भारतातील वैज्ञानिक तंबाखूच्या उत्पादनातील हे सत्य समोर का आणत नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

१९७० मध्ये मोहीम अस्तित्वात
लोकांच्या मनातून तंबाखूविषयीचा गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने तंबाखू कंपन्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाज वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांना एकत्र आणून धुम्रपानाच्या बाजूने जोरदार मोहीम चालवली आहे. कर्करोगाच्या बाजूने आलेले हे संशोधन याच मोहिमेची पुढची कडी आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या अध्ययनानुसार मनोवैज्ञानिक हैंस आइसेंक आणि स्कट्रन या मोहिमेशी जुळले आहेत. ही मोहीम १९७० मध्ये प्रकाशात आली होती. जगातील सात प्रमुख सिगारेट कंपन्यांची एक बैठक १९७७ मध्ये झाली. यात एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

First Published on September 7, 2015 2:13 am

Web Title: tobacco harmful and useful
टॅग Tobacco