राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा ‘आदिवासी विकास पुरस्कार’ सोहळा २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नाशिकमधील महाकवी कालीदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याच्या उपस्थितांमध्ये वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाचाही उल्लेख असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत भुजबळ यांच्या नावाचा उपस्थितांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास असणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या नावांमध्ये खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सुधीर तांबे, आमदार जयंतराव जाधव यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ यांचेही नाव आहे.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

हा पुरस्कार आदिवासी उपयोजना व उपयोजनाबाहेरील क्षेत्रात आदिवासींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती आदिवासी जनतेपर्यंत पोहचविणे, जनजागृती करणे, शिक्षणाचे, स्वयंरोजगाराचे महत्व पटवून देणे, स्वच्छता, कुटुंब नियोजन, बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी जागृती करणे, समाज शिक्षण, सामूहिक विवाह आदी क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने बहूमोल कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी आदिवासी विभागामार्फत देण्यात येतो.

आदिवासी सेवक पुरस्कारार्थी

प्रमोद गायकवाड (नाशिक), रमेश रावले (नाशिक), बापुराव साळवे (अहमदनगर), कांतीलाल टाटीया (नंदुरबार), सरस्वती भोये (पालघर), लक्ष्मण डोके (पालघर), हरेश्वर वनगा (पालघर), मनोहर पादीर (रायगड), रामेश्वर नरे (रायगड), भगवान देशमुख (नांदेड), पुर्णिमा उपाध्ये (अमरावती), सुनील देशपांडे (अमरावती), सदाशिव घोटेकर (यवतमाळ), नवले सुखदेव (औरंगाबाद), राजाराम सलामे (गोंदिया), प्रमोद पिंपरे (गडचिरोली).

आदिवासी सेवा संस्था पुरस्कारार्थी

शाश्वत संस्था पुणे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित राष्ट्र सेवा समिती ग्रामविकास केंद्र वसई, डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, गडचिरोली, वनवासी कल्याण आश्रम, नाशिक, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबावली, पुणे.

पुरस्काराचे स्वरूप

या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या आदिवासी व्यक्तीस २५००१ रुपये आणि संस्थेस ५०००१ रुपये व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

nashik