scorecardresearch

धुळे : दोन चोरांकडून १० दुचाकी जप्त

शिरपूर शहर पोलीस पोलिसांनी दोन संशयितांकडून साडेतीन लाखाच्या १० दुचाकी जप्त केल्या.

police seized 10 bike
धुळे : दोन चोरांकडून १० दुचाकी जप्त

धुळे : शिरपूर शहर पोलीस पोलिसांनी दोन संशयितांकडून साडेतीन लाखाच्या १० दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी एका संशयिताला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी तालुक्यातील वाघाडी गावातील आपल्या घराबाहेरील अंगणातून दुचाकी चोरण्यात आल्याची तक्रार सचिन माळी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी तपासचक्रे फिरवली.

संशयित समाधान बावीस्कर (२२, रा.सोनगीर) हा शिरपूर शहरातील करवंद नाका येथे दुचाकीसह फिरतांना दिसला. त्यास त्याच्याकडील दुचाकीविषयी विचारणा केली असता त्याने सदरची दुचाकी त्याच्या साथीदारासह दभाषी गावाजवळील हनुमान मंदिराजवळून चोरल्याचे  सांगितले. चौकशीत समाधान आणि साथीदाराने वाघाडी, शिरपूर, नरडाणा, सोनगीर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच इतर ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयिताच्या राहत्या घरी सोनगीर येथे जावून तपास केला असता अजून आठ दुचाकी मिळून आल्या. तसेच समाधानने त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकाचे सोनगीर गावात घर दाखविले. त्या बालकाकडे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी मिळून आली. कारवाईत चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करून शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन तर नरडाणा आणि सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल झालेले प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 13:48 IST

संबंधित बातम्या