मनमाड – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेच्या वाणिज्य विभागाने धडक मोहीम सुरू करून धावत्या ७० रेल्वे गाड्यांमधून सुमारे १७.३० लाख रुपयांची दंडात्मक वसुली केली. या कारवाईने फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले.
प्रामुख्याने गर्दीची रेल्वे स्थानके मनमाड, नाशिक, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या रेल्वे स्थानकांवरही तिकीट तपासणी करण्यात आली.

भुसावळ-खंडवा-इगतपुरी, अमरावती-भुसावळ-चाळीसगाव-धुळे या मार्गावरही कारवाईचा धडाका सुरू आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मंडळ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग रेल्वे सुरक्षा दलातर्फे या भागात एक दिवसीय तिकीट निरीक्षण अभियान राबविण्यात आले. वाणिज्य अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने जवळपास ७० धावत्या रेल्वे प्रवाशी गाड्यांवर लक्ष केंद्रित केले. मनमाड, नाशिक, भुसावळ या स्थानकांवर तिकीट निरीक्षण करण्यात आले. या पथकात तीन अधिकारी, तिकीट निरीक्षक, वाणिज्य आणि व्यावसायिक अधिकारी वर्ग, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान अशा ४२ जणांच्या पथकाने एका दिवसात ३०२२ प्रकरणात १७.३० लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळवून दिला.

हेही वाचा – जळगाव : मोर्चातील केवळ पाच व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा; जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक सूचना

हेही वाचा – नाशिक शहरात अनधिकृतपणे वृक्षतोडीचे सत्र; दीड महिन्यात १७ गुन्हे दाखल, २३ लाखांहून अधिकचा दंड वसूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे प्रवाशांनी प्रवासासाठी तिकीट घेऊनच प्रवास करावा, तिकीट खरेदी करण्यासाठी मोठी रांग असेल तर आपला वेळ वाचविण्यासाठी रेल्वेच्या युटीएस ॲपचा उपयोग करावा, योग्य तिकीट खरेदी करून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केले आहे.