नाशिक – मालवणमधील घटना क्लेशदायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. हा आमच्यासाठी श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीचा विषय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, मालवणमधील पुतळ्याची दुर्घटना वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी असल्याचे सांगितले. या घटनेचे राजकारण करणे, त्यापेक्षा अधिक दुर्देवी आहे. उपरोक्त घटनेत जे दोषी असतील, त्यांना सोडले जाणार नाही. चौकशीसाठी शासनाने समित्या स्थापन केल्या आहेत. दोषींना शिक्षा केली जाईल. मालवण येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नौदल व राज्य सरकार उभारणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत वैफल्यग्रस्तांची मजल – केशव उपाध्ये यांची टीका

हेही वाचा – नाशिक : छेड काढणाऱ्या चार टवाळखोरांना मायलेकीने शिकवला चांगलाच धडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ७१ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. राज्यात इतक्या उंचीचा पुतळा नसल्याचा दावा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. सर्व नियमांचे पालन करून, अत्यंत काळजीपूर्वक हा पुतळा उभारण्यात आल्याचेही मालवणच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नमूद केले.