त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाची गळा दाबून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला. या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे आधारतीर्थ आश्रमाच्या कामकाजासह,बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. सायंकाळी उशीरा पर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: नाशिक-मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची गरज; छगन भुजबळ यांचे नितीन गडकरी यांना साकडे

त्र्यंबकेश्वर येथे आधारतीर्थ आश्रम आहे. या ठिकाणी राज्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो. मृत चिमुकला अवघ्या चार वर्षाचा असून आलोक विशाल श्रृंगारे असे त्याचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ याच आश्रमशाळेत शिकत आहे. चिमुकल्याचे नववीतील एका मुला सोबत भांडण झाले होते. त्यातूनच ही हत्या झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती त्र्यंबक पोलीस ठाण्याला समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासात बालकाची हत्या झाली हे समोर आले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सायंकाळी उशीरा पर्यंत सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.