धुळे: तालुक्यातील होरपाडे येथील चार वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत.

होरपाडे, नंदाळे शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी शेतात झाडाखाली खेळणाऱ्या दीदी पावरा या आठ महिन्याच्या बलिकेवर झडप घालून वन्य प्राण्याने फरफटत नेले होते, यात गंभीर जखमी झाल्याने त्या बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जवळच असलेल्या होरपाडे येथे स्वामी दीपक रोकडे या बालकावर बिबट्याने हल्ला केला.

हेही वाचा… नाशिकची जगात आता वेगळी ओळख; बोधीवृक्ष फांदी रोपण महोत्सवातील सूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालक आणि आजोबांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या स्वामीला सोडून जंगलाकडे पळाला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने स्वामीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्य कार्यालयातून परवानगी घेत बिबट्याला पकडण्यासाठी होरपाडे वनक्षेत्रात दोन पिंजरे लावले आहेत. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाच्या वेशीवर बंदोबस्त लावला आहे.