किरकोळ वादाचा राग मनात धरून कक्षसेवकाने (वाॅर्डबाॅय) महिला डॉक्टरवर दवाखान्यातील कात्रीने प्राणघातक हल्ला केला. गंगापूर रस्त्यावरील निम्स रुग्णालयात हा प्रकार घडला. यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यात डॉ. सोनल दराडे या जखमी झाल्या आहेत. याबाबत त्यांचे भाऊ सुकदेव आव्हाड यांनी तक्रार दिली.

हेही वाचा- खडसे पती-पत्नीच्या अडचणीत वाढ

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

डॉ. दराडे या गंगापूर रस्त्यावरील निम्स रुग्णालयात कार्यरत आहेत. रुग्ण तपासणीवेळी त्यांना स्वच्छतेबाबत काही त्रुटी आढळल्या होत्या. याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी कक्षसेवक अनिकेत डोंगरेशी किरकोळ वाद झाल्याचे सांगितले जाते. राग मनात धरून संशयिताने दवाखान्यातील कात्रीने त्यांच्यावर वार केले. त्यात डॉ. दराडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संशयित डोंगरेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख, सहायक निरीक्षक अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संशयित डोंगरेला (रा.संत कबीरनगर) अटक केल्याची माहिती तपास अधिकारी पवार यांनी दिली.