सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील साई टेक लिमिटेड कंपनीस मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
हेही वाचा – नाशिक : हमालवाडीतील खून प्रकरणी दोन अल्पवयीन संशयित ताब्यात
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात पाच घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे जिंदाल कंपनीत आग लागली होती. या आगीत जिवीत तसेच वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. या घटनेची अजून चर्चा होत असताना मंगळवारी सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील साईटेक कंपनीच्या गोदामास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिका, तसेच औद्योगिक वसाहत परिसरातून बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. आगीमुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.