scorecardresearch

जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

त्यांनी शेतात मका आणि केळीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सोसायटी व पीककर्ज घेतले होते.

जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून जळगाव तालुक्यातील करंज येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील करंज येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी आणि कर्जामुळे राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी शरद पाटील (३९) पत्नी आणि दोन मुलांसह करंज येथे वास्तव्याला होते.

हेही वाचा- सप्तश्रृंगीदेवी मंदिराचे लवकरच नुतनीकरण, गडावरील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच

त्यांनी शेतात मका आणि केळीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी विविध कार्यकारी सोसायटी व पीककर्ज घेतले होते. सततची नापिकी आणि कर्ज वाढल्याने पाटील हे विवंचनेत होते. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे पत्नी अनिता यांना दिसले. रहिवाशांच्या मदतीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. पाटील यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, लहान भाऊ असा परिवार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 11:48 IST

संबंधित बातम्या