नाशिक – शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध आणि टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात अचानक शोध मोहीम राबविण्यात आली. या मेहिमेत ४६१ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री ?

हेही वाचा – टोमॅटोच्या शेतात गांजाची शेती, १३ लाख रुपयांची झाडे जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ एक आणि दोनचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड विभाग यांच्या सहायक आयुक्तांच्या देखरेखीखाली सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवली. परिमंडळ एक अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या २३३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. २३२ संशयित वाहनांची तपासणी करुन ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. परिमंडळ दोन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या २२८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ९६ संशयित वाहनधारकांवर ६८, ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला.