जळगाव : जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी ८० लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. यात एकूण अंदाजपत्रकाच्या ३३ टक्के तरतूद आरोग्य व पंचायत राज कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. तसेच समाजल्याण, शिक्षणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी साडेसात कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> धुळे : वीज कंपनीचे दोन अधिकारी लाच स्विकारताना जाळ्यात

जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपला. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभार असून, २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक अर्थ, वित्त लेखा विभागातर्फे सादर करण्यात आल्यानंतर ते डॉ. आशिया यांनी ठराव समितीकडे मांडले. समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, राजेंद्र खैरनार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक २९ कोटींचे होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे दुसर्‍या वर्षीही सदस्यांविनाच अंदाजपत्रक सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेची सदस्य निवडप्रक्रिया होऊन पुढील वर्षी समिती स्थापन होईल. त्यानुसार २०२३-२४ साठी पंचायत राज कार्यक्रमासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.

गतवर्षी दोन कोटी सात लाख ६२ हजारांची तरतूद होती. यात चार लाखांची वाढ करून सहा कोटी १७ लाख २१ हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात सर्वाधिक तरतूद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व पंचाय राज विकास विभागासाठी प्रत्येकी साडेसात लाखांची करण्यात आली, तर बांधकाम विभागासाठी एक कोटी साठ लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी एक कोटी ३७  लाख, कृषी विभागासाठी एक कोटी, गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी ३३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र डिजिटल करण्यासह ग्रामीण भागात लस पाठविण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नाशिक:इगतपुरीजवळील अपघातात चार जणांचा मृत्यू;मृत ठाणे जिल्ह्यातील रहिवासी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे संगणकीय कार्यप्रणाली उभारण्यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लस वेळेवर पोहोचावी व भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी यंदा अंदाजपत्रकात तीन लाखांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याणसाठी दोन कोटी ९१ लाख ८० हजारांची तरतूद करण्यात आली असून, याच विभागांतर्गत दिव्यांग बांधवांसाठी एक कोटी २२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी अंदाजपत्रक मंजूर करीत २०२२-२३ या वर्षासाठी २२ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. यात यंदा वाढ करीत ३३ कोटी ८० लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व जमिनी महसूल, अभिकरण शुल्क यांसह विविध करांतून वाढ होणार आहे.