नाशिक – लम्पी या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव १२ तालुक्यांपर्यंत पसरल्याने निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण जिल्हा लम्पी चर्मरोग आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता जनावरांची खरेदी-विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शनाच्या आयोजनास प्रतिबंध राहणार आहे. तसेच जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. या आजाराच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ५२६ जनावरे बाधित होऊन ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. साथीचा फैलाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्राण्यांमधील संक्रमण, सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमान्वये संपूर्ण जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यातील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करणे, शीघ्र कृती दल स्थापन करून आजार नियंत्रणासाठी प्रतिबंधीत लसीकरणाचे तातडीने नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले. बाधित क्षेत्रात म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी-विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांच्या आयोजनास प्रतिबंध राहणार आहे. जनावरांची आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल. परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या पशुधनाच्या तपासणीसाठी आंतरराज्य मार्गावर तपासणी नाका सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

हेही वाचा >>>शासन आपल्या दारीऐवजी पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, आमदार खडसेंचा सरकारला सल्ला

जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी तातडीने लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयास संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे निर्जंतुक फवारणी, साथीच्या रोगात मृत पावलेल्या जनावरांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>बहुचर्चित १५ खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

३० जनावरांचा मृत्यू

लम्पीच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. १२ तालुक्यांमध्ये या आजाराचा संसर्ग पसरला असून या लाटेत ५२६ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला. ५५ जनावरे गंभीर आहेत. पहिल्या लाटेत जिल्ह्यात १९०७ जनावरे बाधीत झाली होती. तर ११५ जनावरे मृत्युमुखी पडली होती. १०३ पशुपालकांना २६ लाख ७९ हजाराची रक्कम मदत म्हणून देण्यात आल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.