नाशिक – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तीन जून रोजी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त नाशिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वर्धापन दिन साजरा करण्यासाठी विभागीय कार्यालयास २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. इतक्या कमी खर्चात कार्यालयास वर्धापन दिनाचा आनंद साजरा करावा लागणार आहे.

पुणे-अहमदनगर मार्गावर एक जून १९४८ रोजी महामंडळाची पहिली बस धावली. महामंडळाच्या वतीने दरवर्षी तीन जून रोजी राज्याच्या प्रत्येक विभागात वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने बस आगार सुशोभिकरण, रांगोळी काढून बस स्वच्छ धुणे, साखर अथवा मिठाई वाटप करणे, अशा सूचना महामंडळाकडून करण्यात आल्या आहेत. यासाठी २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे.

हेही वाचा – नाफेडच्या खरेदीनंतरही निरुत्साह, लासलगाव बाजारात कांदा दरात अल्प घसरण

नाशिक आगारात महामंडळाच्या ७०० पेक्षा अधिक बस ठिकठिकाणी धावत आहेत. दररोज सरासरी दोन लाख, ६५ हजार किलोमीटर अंतर कापले जाते. या माध्यमातून ९० लाख रुपये महसूल प्राप्त होतो. महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. या योजनांच्या माध्यमातून एक कोटी, १० लाख रुपयांचा महसूल आतापर्यंत प्राप्त झाला आहे. सरासरी दोन लाख प्रवासी विभागातील ५९० मार्गांवरून प्रवास करत असतात.

हेही वाचा – नाशिक : एल्गार संघटनेतर्फे आदिवासी विकास मंत्र्यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चाची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामंडळासमोर अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक सुविधांचा अभाव, खासगी व्यावसायिकांची स्पर्धा अशा वेगवेगळ्या अडचणी येत असतानाही प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळ कार्यरत आहे. प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.